Home बातम्या आणखी १५५८ आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोना लस

आणखी १५५८ आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोना लस

0

राज्यात काल आणखी १५५८ आरोग्य आणि फ्रंट लाइन कर्मचार्‍यांना कोरोना प्रतिबंधक लस काल देण्यात आली आहे.
राज्यातील आणखी ८४६ आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. सुमारे ३६०० आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोना लस देण्याचे निश्‍चित करण्यात आले होते. प्रत्यक्षात ८४६ जणांना कोरोना लस देणे शक्य झाले आहे. उत्तर गोव्यात ५६८ आणि दक्षिण गोव्यात २७८ जणांना लस देण्यात आली आहे.
राज्यातील आणखी ७१२ फ्रंट लाइन कर्मचार्‍यांना कोरोना लस काल देण्यात आली आहे. उत्तर गोव्यात ३९० आणि दक्षिण गोव्यात ३२२ फ्रंट लाइन कर्मचार्‍यांना लस देण्यात आली आहे. राज्यातील २१०० फ्रंट लाइन कर्मचार्‍यांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.