Home बातम्या राज्यात गुरुवारीगडगडाटासह पाऊस

राज्यात गुरुवारीगडगडाटासह पाऊस

0

भारतीय हवामान खात्याने गुरुवार दि. 23 एप्रिल रोजी राज्याला यलो अलर्ट दिला असून, या दिवशी राज्यात गडगडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यावेळी ढगांचा गडगडाट, विजांचा चमचमाट याबरोबरच वादळी वारेही वाहणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. वारे ताशी 30 ते 40 किमी. एवढ्या वेगाने वाहणार असल्याचे खात्याने म्हटले आहे. हा पाऊस काही ठिकाणी कोसळण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता वाढली असून, त्यामुळे बाहेर पडणे कठीण झाले आहे. तापमान तसेच आर्द्रता वाढल्याने उष्णता जास्त जाणवत असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.