राज्यातील महाविद्यालये ७ जूनपासून सुरू होणार

0
92

>> शिक्षण प्रक्रिया डिजिटल पद्धतीनेच

गोवा विद्यापीठासह राज्यातील महाविद्यालये सोमवार दि. ७ जूनपासून पुन्हा सुरू करण्याबाबत उच्च शिक्षण संचालनालयाने काल परिपत्रक जारी केले. कोरोनामुळे शिक्षण प्रक्रिया डिजिटल पद्धतीनेच सुरू राहणार असल्याचे उच्च शिक्षण संचालक प्रसाद लोलयेकर यांनी स्पष्ट केले आहे.
गोवा विद्यापीठासह महाविद्यालयांतील प्रशासकीय व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी दि. ७ जूनपासून कामावर हजर राहावे. गोवा विद्यापीठातील शिक्षकांना दि. ७ जून आणि महाविद्यालयातील शिक्षकांना दि. ८ जूनपासून कामावर हजर राहण्यास सांगितले आहे. ज्या कर्मचार्‍यांवर कोविडविषयक काम सोपवले आहे, त्यांना टप्प्याटप्प्याने मुक्त करण्यात येईल, असे परिपत्रकातून कळवले आहे. दरम्यान, अनुदानित आणि विनाअनुदानित शिक्षण संस्थेतील शिक्षकेतर कर्मचार्‍यांना दि. ७ जूनपासून कामावर हजर राहण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिले आहेत.