सीरम इन्स्टिट्यूट करणार स्पुतनिक लसीची निर्मिती

0
96

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आता रशियाच्या ‘स्पुतनिक व्ही’ या लसीचेही उत्पादन करणार आहे. त्यासाठी भारतीय औषध महानियंत्रकांनी सीरमला काल परवानगी दिली. सीरम इन्स्टिट्यूटने केंद्र सरकारकडे स्पुतनिक लसीच्या उत्पादनाची मागणी केली होती. पुण्यातील हडपसर येथील सीरमच्या प्लांटकडे अधिकृत परवाना असल्याने स्पुतनिक व्हीच्या परीक्षण, चाचणी आणि विश्लेषणासाठी मंजुरी दिली गेली आहे. त्यामुळे सीरम इन्स्टिट्यूटमध्ये कोविशिल्डनंतर स्पुतनिक व्ही लस निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. स्पुतनिक व्ही लसीची निर्मिती करणारी सीरम इन्स्टिट्यूट सहावी कंपनी आहे.