Home बातम्या युद्धावरील चर्चेसाठी संसदेत गदारोळ

युद्धावरील चर्चेसाठी संसदेत गदारोळ

0

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी लोकसभा आणि राज्यसभेत अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धावरील चर्चेच्या मागणीसाठी जोरदार गदारोळ झाला. विरोधकांनी पश्चिम आशियातील युद्धोत्तर परिस्थितीवर चर्चा करण्याची मागणी केली. दरम्यान, परराष्ट्रमंत्र्यांनी प्रथम राज्यसभेत आणि नंतर लोकसभेत आखाती देशांमधून भारतीयांच्या परतीच्या तयारी आणि ऊर्जा संकटाबद्दल भाष्य केले. सध्या इराणच्या नेतृत्वाशी संपर्क साधणे कठीण आहे, परंतु भारत शांतता आणि संवादाच्या बाजूने आहे, असे जयशंकर म्हणाले. राज्यसभेत विरोधी पक्षांनी सभात्याग केला. तसेच लोकसभेतही विरोधी पक्षांनी परराष्ट्रमंत्र्यांना बोलण्यापासून रोखले. त्यांच्या भाषणादरम्यान त्यांनी गोंधळ घातला. खासदारांनी आम्हाला चर्चा हवी आहे, अशी घोषणाबाजी त्यांनी केली. दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना हटवण्याच्या मागणीच्या विरोधकांच्या प्रस्तावावरील चर्चेवेळी देखील गदारोळ झाला.