Home बातम्या रेबिजविरोधी लसींचापुरवठा सुरळीत करा

रेबिजविरोधी लसींचापुरवठा सुरळीत करा

0

दक्षिण गोव्यातील जिल्हा इस्पितळासह बहुतेक प्राथमिक आरेग्य केंद्रात रेबिजविरोधी लसींचा तुटवडा असून, सरकारने लवकरात लवकर या लसींचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी काल शून्य तासाला गोवा विधानसभेत केली. यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, क्रूझ सिल्वा, विजय सरदेसाईंसह अन्य विरोधी आमदारांनीही ही गंभीर बाब असून, या लसींचा लवकरात लवकर पुरवठा करण्याची मागणी केली. राज्यात भटक्या श्वानांची संख्या वाढलेली असून, पर्यटकांसह स्थानिक लोकांवर श्वानांकडून हल्ले होण्याच्या घटना वाढत असल्याने विनाविलंब रेबिज प्रतिबंधक लसींचा पुरवठा केला जावा, अशी मागणी वरील आमदारांनी यावेळी केली. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे हे विधानसभेत हजर नसल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी या विषयात लक्ष घालण्याचे आश्वासन यावेळी दिले.