युतीबाबत मगोकडून सर्वेक्षण सुरू

0
82

येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपबरोबर युतीच्या प्रस्तावावर राज्यातील २५ मतदारसंघातील मगो समर्थक मतदार व कार्यकर्त्यांचा कल पहाण्यासाठी पक्षाने वरील सर्व मतदारसंघातून सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यासाठी मगो पक्षाचीच यंत्रणा काम करीत असल्याची माहिती आमदार लवू मामलेदार यांनी दिली.

वरील सर्वेक्षण अहवाल पक्षापर्यंत पोचण्यासाठी महिनाभर लागेल. अहवाल आल्यानंतर युतीच्या बाबतीत पक्षाला ठाम असा निर्णय घेणे शक्य होईल. युती केल्यानंतरही भाजपचे काही कार्यकर्ते मगोच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी प्रयत्नशील असतात, याचा अनुभव पक्षाला आल्याने आपल्यासह अनेक पदाधिकार्‍यांचा युतीस पूर्वीपासूनच विरोध असल्याचे मामलेदार यांनी सांगितले. युतीच्या बाबतीत निर्णय घेताना अन्य राजकीय विषयांचाही अभ्यास करावा लागतो असे ते म्हणाले.