युक्रेनमध्ये रासायनिक अस्त्रांच्या वापराची ब्रिटनला भीती

0
15

रशिया आणि युक्रेनमधील युद्धात रशियाकडून रासायनिक अस्त्रे वापरण्यात येण्याची भीती ब्रिटनने व्यक्त केली आहे. रशिया व युक्रेनमध्ये सलग २० व्या दिवशीही सुरूच असून याच दरम्यान युक्रेनमध्ये रासायनिक युद्ध होऊ शकते, असा दावा ब्रिटनने केला आहे. तथापि, या दाव्याचे समर्थन करण्यासाठी यूकेने कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. याआधी अमेरिकेनेही रशियावर हा आरोप केला होता. रशियन सैनिक युक्रेनच्या विविध शहरांना लक्ष्य करत आहेत. पूर्वेकडील लुहान्स्कमधील पोपस्ना शहरात व्हाईट ङ्गॉस्ङ्गरस बॉम्बचा वापर करण्यात आल्याचा आरोप युक्रेनने केला आहे, जे मानवांसाठी अत्यंत घातक आहेत.