युक्रेनहून आलेल्यांचा शिक्षण खर्च तेलंगणा सरकार करणार

0
10

रशिया-युक्रेन युद्धामुळे युक्रेनमधून परत आलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च तेलंगणा सरकारने उचलण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणा सरकारचे मंत्री के. टी. रामाराव यांनी ही घोषणा केली आहे. केंद्र सरकारने खास ‘ऑपरेशन गंगा’ चालवून सर्व १८,००० भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून परत आणले आहे. युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारने अनेक सवलतीही जाहीर केल्या आहेत. देशातील सर्व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील ५०% जागांवर सरकारी वैद्यकीय-शैक्षणिक संस्थांच्या बरोबरीने ङ्गी आकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.