म्हापशातील अपघातात एक ठार; तर एक जखमी

0
55

शेळपे-कुचेली म्हापसा येथे काल दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात एक ठार, तर एक जखमी झाला. या अपघातात समीर वेर्णेकर (वय ४८, रा. सडये-शिवोली) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. हा अपघात सोमवारी सकाळी ११.४५ च्या सुमारास शेळपे-कुचेली रस्त्यावर घडला. या अपघातात महम्मद रशीद (वय २४, रा. कांदोळी) हा जखमी झाला.
शेळपे-कुचेली मार्गावर समीर वेर्णेकर यांच्या दुचाकी (क्र. जीए-०३-एए-०१४५) आणि महम्मद रशीद (जीए-०३-एजे-४२१०) याच्या दुचाकीची समोरासमोर धडक बसली. त्यात दोघेही जखमी झाले. जखमींना येथील जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. गंभीर जखमी समीर वेर्णेकर यांना पुढील उपचारार्थ गोमेकॉत दाखल केले, तेथे सायंकाळी उशिरा त्यांचे निधन झाले. रशीद याच्यावर जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत.