Home Featured मोपातील मनोहर विमानतळावर गव्याने केला प्रवेश!

मोपातील मनोहर विमानतळावर गव्याने केला प्रवेश!

0

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी रात्री 8 च्या सुमारास गव्याने प्रवेश केला. अचानक आलेल्या गव्यामुळे प्रवाशांसह कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली.
पेडणे तालुक्यातील अनेक गावांतील लोकवस्ती वन्यप्राणी घुसू लागले आहेत. त्यात गव्यांचाही समावेश आहे. गव्यांचे कळप शेती-बागायतीमध्ये घुसून शेतीची नासधूस केल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यातच काल मोपातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आवारात गव्याने प्रवेश केल्यामुळे एकच खळबळ माजली. त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी गव्याला हुसकावून लावले.