मोपाच्या प्रत्यक्ष कामाचे १० एप्रिलला भूमीपूजन

0
88

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा केली. मोपा विमानतळ उभारणीवरही पंतप्रधानांशी चर्चा झाली. मोप विमानतळाच्या प्रत्यक्ष कामाचे भूमीपूजन दि. १० एप्रिल रोजी होणार आहे. पर्रीकरांसोबत यावेळी आमदार सिध्दार्थ कुंकळ्‌ळकर हेही होते. राज्यात पाणी व वीजपुरवठा यंत्रणेत मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारण्याच्या प्रस्तावांवरही आवश्यक सहकार्य करण्याचे आश्‍वासन पंतप्रधानांनी दिल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.
मोपा प्रकल्पासाठी वेगवेगळ्या सरकारी यंत्रणेकडील ना हरकत दाखल्यांची गरज आहे. त्यामुळे मोप आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यासाठी वरील परवाने मिळविण्यासंबंधी कंत्राटदार जीएमआर या कंपनीने केंद्र सरकारकडे सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे कामास चालना मिळू शकेल. या प्रकल्पासाठी हवाई सर्वेक्षण, भूचांचणी आदी कामे पूर्ण झाली असून प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी तयारी झाली आहे.