दाजी साळकर यांना समर्थकांसह अटक; सुटका

0
103

मुरगाव पालिका मंडळाच्या मुख्याधिकारी दीपाली नाईक यांच्या कार्यालयात घुसून त्यांना जाब विचारत त्यांना घेराव घातल्याप्रकरणी श्रीमती नाईक यांनी दाजी साळकर व त्यांच्या समर्थकांविरोधात केलेल्या तक्रारीवरून वास्को पोलिसांनी काल दुपारी नगरसेवक दाजी साळकर यांच्यासह त्यांच्या १८ समर्थकांना अटक केली. तद्नंतर न्यायालयाने त्यांची १० हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीवर त्यांची सुटका केली.
मुरगाव पालिकेच्या मुख्य अधिकारी दीपाली नाईक यांनी गेल्या शुक्रवार दि. २४ रोजी दाजी साळकर यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी आपल्या कार्यालयाबद्दल तसेच धमकी दिल्याबद्दल वास्को पोलिसात त्यांच्याविरुध्द लेखी तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेऊन या समर्थकांविरुध्द गुन्हा नोंद केला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी नंतर वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक नोलास्को रापोस यांनी चौकशीसाठी काल सकाळी दाजी साळकर व त्यांच्या अन्य सहा समर्थकांना वास्को पोलीस स्थानकात पाचारण केले होते. पण ही माहिती अन्य समर्थकांना कळताच त्यांनी सर्वांनी वास्को पोलीस स्थानक गाठून स्वत:लाही अटक करून घेतली. अटक करण्यात आलेल्यात दाजी साळकरसह पत्नी शमी साळकर, बंधू महेंद्र साळकर व इतरांचा समावेश आहे.