मोदींचेे मन की बातमध्ये तरुण पिढीला आवाहन

0
47

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रविवारी ‘मन की बात’ मध्ये तरुणांना मार्गदर्शन करताना नवीन ध्येय डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल करा असे आवाहन केले. मोदींनी मेजर ध्यानचंद यांच्यापासून आपल्या भाषणाची सुरुवात केली.

मोदींनी आज मेजर ध्यानचंद यांची जयंती आहे. या वेळी ऑलिम्पिकमध्ये हॉकीला चार दशकांनंतर पदक मिळाले आहे. मेजर ध्यानचंदजींना ते जिथे असतील तिथे किती आनंद असेल याची तुम्ही कल्पना करू शकता असे म्हटले. त्यांतर खेळांवरून मोदींनी तरुण पिढीकडे वळताना आपण तरुण पिढीकडे बारकाईने पाहतो तेव्हा त्यांच्यात मोठा बदल दिसून येतो. तरुणांचे मन बदलले आहे आणि आजच्या तरुण मनाला जीर्ण झालेल्या जुन्या पद्धतींमधून काहीतरी नवीन करायचे आहे, काहीतरी वेगळे करायचे आहे आणि ते त्यांनी करावे असे आवाहन केले.