संयुक्त किसान मोर्चाने दिली २५ रोजी भारत बंदची हाक

0
33

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातील प्रमुख भूमिका निभावणार्‍या संयुक्त किसान मोर्चाने येत्या २५ सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. आंदोलनास दहा महिने पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारत बंद पुकारण्यात आला आहे.

हरियाणामधील नूंह येथे किसान महासभेच्या पत्रकार परिषदेत बोलताना, संयुक्त किसान मोर्चाचे नेते दर्शन पाल सिंह यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी दि. २५ रोजी दिल्ली ठप्प करण्याचे आवाहन शेतकर्‍यांना केले. तसेच यावेळी त्यांनी, ५ सप्टेंबर रोजी मुझफ्फरनगर महापंचायतीमध्ये ‘मिशन यूपी’ची घोषणा करणार असल्याचे सांगितले.

दिल्लीत वाहतूक कोंडी
दरम्यान, कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे दिल्ली उत्तर प्रदेश सीमेवर वाहतूक कोंडी होत आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला फटकारले असून अशा पद्धतीने वाहतूक कोंडी केली जाऊ शकत नाही, यासाठी सरकारला तोडगा काढावा लागेल. शेतकर्‍यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र वाहतूक कोंडी करू शकत नाही, असे म्हटले आहे. केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारने यावर दोन आठवड्यात तोडगा काढावा, अशी ताकीद सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे.