राज्यातील संचारबंदी आठवड्याने वाढवली

0
38

कोविड महामारीमुळे राज्यात लागू करण्यात आलेली संचारबंदी गोवा सरकारने पुन्हा एकदा आठ दिवसांनी वाढवली आहे. राज्यात येत्या ६ स्पटेंबर रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. मागील संचारबंदीच्या काळातील नियमांत यावेळी सरकारने कोणतेही बदल केलेले नाहीत. मांडवी नदीतील तरंगणार्‍या कॅसिनोसह राज्यातील सर्व कॅसिनो, प्रेक्षकागृहे, समाजसभागृहे, जलक्रीडा, जलउद्याने, करमणूक उद्याने, स्पा, मसाज पार्लर्स ही बंदच राहतील. तसेच एखाद्या स्थळावर त्याच्या क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना एकत्र आणून कोणतेच सोहळे आदी आयोजित करण्यास परवानगी नाही.