मेहुल चोक्सी डॉमिनिका देशाच्या तुरुंगात

0
104

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार मेहुल चोक्सी सध्या डॉमिनिका देशाच्या तुरुंगात असून त्याचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. चोक्सीच्या डोळ्याला इजा झाली असून हातावर जखमा झालेल्या आहेत.

भारतातून पळून गेल्यानंतर तीन वर्षांनंतर पहिल्यांदाच मेहुल चोक्सीची छबी कॅमर्‍याने टिपली आहे. अपहरण आणि मारहाणीचा दावा यावेळी चोक्सीने केला आहे. चोक्सीची डॉमिनिका पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. देशात बेकायदा प्रवेश केल्याचा ठपका मेहुल चोक्सीवर डॉमिनिका सरकारने ठेवला आहे.

मेहुल चोक्सीने जॉली हार्बर येथून अपहरण झाल्याचा दावा चोक्सीचे वकील वेन मार्श यांनी केला आहे.
दरम्यान, चोक्सीला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच्या प्रत्यार्पणासाठी लागणारी कागदपत्रे डॉमिनिकाला पाठवली गेली आहेत. तसेच, भारताचे खासगी विमान डॉमिनाकमध्ये २८ मे रोजी दाखल झाले असल्याचेही वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे.