मुलांच्या लसीकरणाचा निर्णय अशास्त्रीय : राय

0
6

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी मुलांच्या लसीकरणाची घोषणा केली. ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू होणार आहे. मात्र, एम्सचे वरिष्ठ संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. संजय के. राय यांनी सरकारच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी केंद्राचा हा निर्णय ‘अशास्त्रीय’ असल्याचे म्हटले आहे.

राय हे इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशनचे अध्यक्षही आहेत. लहान मुलांच्या बाबतीत संसर्गाची तीव्रता खूपच कमी असते. त्यामुळे या लसीकरणातून कोणताही अतिरिक्त फायदा होणार नाही. हे पाऊल उचलण्यापूर्वी सरकारने इतर देशांच्या डेटाचे विश्लेषण करायला हवे होते, जिथे मुलांचे लसीकरण सुरू आहे, असे राय म्हणाले. मी पंतप्रधान मोदींचा खूप मोठा प्रशंसक आहे; पण मुलांच्या लसीकरणाच्या त्यांच्या ‘अशास्त्रीय’ निर्णयामुळे मी पूर्णपणे निराश झालो आहे, असेही राय यांनी म्हटले आहे.