मुख्यमंत्री-आरोग्यमंत्र्यांतील वादावर अमित शहा, तानावडे यांची मध्यस्थी

0
74

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्यातील वादावर तूर्त तोडगा काढण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी मध्यस्थी केली आहे.
दोघांतील परस्परविरोधी विधानांनंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सरकारी इस्पितळातील कोविड उपचारात सुधारणा करण्यावर भर दिला होता.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्यातील गोमेकॉतील कोविड उपचार, उपाययोजना प्रश्‍नाबाबत परस्पर विधाने ही आमची अंतर्गत बाब असून त्यावर तोडगा काढण्यात आला आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी म्हटले आहे. प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी बुधवारी मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि आरोग्यमंत्री राणे यांची अनौपचारिक बैठक घेतली. ही बैठक सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आलेला फोन हा निव्वळ योगायोग आहे, असे तानावडे यांनी म्हटले आहे.

भाजपमध्ये एकमेकांवर कुरघोडीचे प्रयत्न सुरू झाले. पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या समर्थक नगरसेवकाने आरोग्यमंत्री राणे यांच्याविरोधात कोरोना रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी पणजी पोलीस स्थानकावर तक्रार दाखल केली आहे.