ऑक्सिजन कॉन्संट्रेटर दोन विमानांद्वारे राज्यात दाखल

0
145

संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या पुढाकाराने भारतीय वायुसेनेची दोन विमाने काल ऑक्सिजन कॉन्संट्रेटर व अन्य वैद्यकीय साहित्यासह गोव्यात दाखल झाली.

गोव्यातील वाढते कोरोना रुग्ण आणि दिवसेंदिवस वैद्यकीय यंत्रणेवरील वाढता ताण लक्षात घेऊन गोवा सरकारने बुधवारी संध्याकाळी मंत्री श्रीपाद नाईक यांची मदत मागितली होती. मंत्री श्री. नाईक यांनी त्वरित काल वायुसेनेची दोन विमाने ३२३ ऑक्सिजन कॉन्संट्रेटर व अन्य वैद्यकीय उपकरणांसह गोव्यात पाठवली. गोव्यात लवकरात लवकर प्राणवायू प्रकल्प व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्य सरकारने वेळीच आपल्याला त्याची गरज कळवावी. ती पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करू असे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.