माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे माजी संचालक मीनिमो पिरीस (६९) यांचे काल पर्वरी येथे त्यांच्या निवासस्थानी अल्पआजाराने निधन झाले. ते गेल्या काही काळापासून मूत्रपिंड विकाराने आजारी होते. ऑगस्ट २०१२ मध्ये ते माहिती खात्याच्या संचालकपदावरून निवृत्त झाले होते. उजवाड या कोकणी वृत्तपत्रातून पत्रकार म्हणून त्यांनी आपली कारकिर्द सुरू केली होती. आकाशवाणीवर वृत्तनिवेदक म्हणून तसेच पत्रसूचना खात्यातही त्यांनी काम केले होते. १९८० मध्ये माहिती आणि प्रसिद्धी खात्यात ते रुजू झाले होते.