काल रात्री ८.३० रोजी मालपे पेडणे रेल्वे स्थानकाच्या जंक्शनवर बेंगलोरहून मुंबईला जाणारी ट्रकवाहू रेल्वे पोचली असता त्यातील एका ट्रकास अचानक आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर रेल्वे लाल बावटा दाखवून थांबवण्यात आली. दरम्यान, आग लागलेल्या ट्रकातील चालक भाजला गेला. रेल्वेची थांबण्यापूर्वीच त्याने ट्रकातून उडी मारली व तेथेच मरण पावला.
पेडणे अग्नीशामक दलाला माहिती मिळताच तातडीने दोन बंब घटनास्थळी पोचले.
पी. देसाई, जेबी मळीक, डी. पेडणेकर, शिवाजी बर्डे, संजय फडते, सीताराम मांद्रेकर, वासुदेव हळदणकर, विशाल पाटील, विष्णू केसरकर, अर्जुन धावस्कर या जवानांनी आग आटोक्यात आणली.