मिळालेल्या माहितीनुसार खोत यांना कॉंग्रेसने काणकोण मतदारसंघाची उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळेच ते बर्याच काळापासून कॉंग्रेस प्रवेशाच्या प्रतीक्षेत होते.
माजीमंत्री इजिदोर फर्नांडिस गेली चार वर्षे काणकोण मतदारसंघात काम करीत असून त्यांनीही कॉंग्रेस उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. दोन दिवसांपूर्वी राजधानीत त्यांच्य समर्थकांनी शक्ती प्रदर्शनही घडविले होते. राजीनामा दिल्यानंतर खोत यांना कारण विचारले असता, भाजप नेत्यांनी आपल्याला व आपल्या मतदारांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे आपण राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. कॉंग्रेस प्रवेश करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. काणकोण मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा सल्ला घेऊनच योग्य तो निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.