Home बातम्या दाबोळीत मगोने उमेदवार बदलला

दाबोळीत मगोने उमेदवार बदलला

0

पक्षाच्या नेत्यांनी यापूर्वी दाबोळी मतदारसंघातून चिखली पंचायतीचे विद्यमान पंच प्रताप म्हार्दोळकर यांचे नाव जाहीर केल्यानंतर म्हार्दोळकर यांनी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली होती. मात्र बुधवारी झालेल्या राजकीय घडामोडीमध्ये म्हार्दोळकर यांचे नाव बदलून माजी नगराध्यक्ष क्रितेश गावकर यांचे नाव पुढे आले होते. मात्र गुरुवारी शेवटी प्रेमानंद नानोस्कर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. नानोस्कर यांना पक्षाने ‘बी’ अर्ज दिल्याने नानोस्कर हेच उमेदवार असल्याचे सिद्ध झाले आहे.

बळीचा बकरा केला : म्हार्दोळकर

वरील प्रकारामुळे संतप्त बनलेले प्रताप म्हार्दोळकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी आपल्याला बळीचा बकरा केल्याचा आरोप करून पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे सांगितले. आपण उमेदवारी मागितली नव्हती. पण ढवळीकर यांनी आपल्याला बोलावून उमेदवारी दिली होती असे स्पष्ट करून ढवळीकरांचे पितळ उघडपाडण्यासाठी प्रियोळ मतदारसंघातून ढवळीकरांच्या विरुद्ध प्रचार करणार असल्याचे ते म्हणाले.