शिक्षण माध्यमप्रश्नी पर्रीकर सरकारशी आपली सहमती नसल्याचे आमदार विष्णू सुर्या वाघ यांनी काल गोवा राखण मंचने माध्यमप्रश्नी पणजीत आयोजित केलेल्या धरणे कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
माध्यमप्रश्नी तोडगा काढण्याच्या नावाखाली सरकारने द्विभाषिक पुस्तके लागू करण्याचा निर्णय घेऊन इंग्रजी माध्यमातील शाळांना अनुदान देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाशी आपण सहमत नसल्याचे वाघ यांनी यावेळी स्पष्ट केले.