भाजपने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘चाय पे चर्चा’ नावाचा जो कार्यक्रम सुरू केलेला आहे त्याच धर्तीवर माध्यमप्रश्नी भाजप सरकारविरोधात जनजागृती करण्यासाठी गोवा राखण मंच ‘कदेल पे मोर्चा’ या नावाचा कार्यक्रम गावागावात आयोजित करणार असल्याचे राजदीप नाईक यांनी काल सांगितले. वरील शिर्षकाखाली गावागावात पथनाट्ये व अन्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
माध्यमप्रश्नी पेडण्यापासून काणकोणपर्यंत व मोलेपासून वास्कोपर्यंत जनजागृती कार्यक्रम करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.