Home बातम्या आंबेलीतील खूनप्रकरणी एकास अटक

आंबेलीतील खूनप्रकरणी एकास अटक

0
सखुबांध आंबेली येथील साळ नदीत हातपाय बांधलेल्या अवस्थेत अज्ञाताचा मृतदेह सापडला होता. तो मृतदेह विजय पुजार (२७) या इसमाचा असल्याचे दिसून आल्यानंतर कुंकळ्ळी पोलिसांनी तपास सुरू केला होता. त्यानंतर पाच महिन्यांनी पोलिसांनी या प्रकरणी जाफर मोहिद्दीन मुल्ला (३५) याला अटक केली. तो मूळ हावेरी कर्नाटकातील आहे. गेल्या दि. १३ ऑक्टोबर रोजी ही खुनाची घटना घडली होती.

नदीत नायलॉनच्या दोरीने गळ्याभोवती दगड बांधलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. विजय पुजार हा वेळ्ळी येथे गवंडी काम करीत होता. ९ ऑक्टोबर २०१३ पासून तो बेपत्ता होता. जाफर हा गुन्हेगार असून हावेरी पोलीस स्टेशनवर त्यासंदर्भात नोंद आहे. त्याला काल कोर्टात उभे केले असता, न्यायालयाने सात दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली.