माजी खाण सचिवांची एसआयटीसमोर जबानी

0
68

खाण घोटाळ्याचा तपास करणार्‍या विशेष तपास पथकाने माजी खाण सचिव जे. के. दादू यांची खाण घोटाळा प्रकरणी जबानी नोंदवून घेतली आहे.
तत्कालीन खाण मंत्री दिगंबर कामत यांनी मुदत संपलेल्या खाणींना मंजुरी देताना आपली शिफारस धुडकावली, अशी जबानी दादू यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
खाण खात्याच्या अधिकार्‍यांकडून माजी खाण मंत्री कामत यांच्याकडे बोट दाखविले जात आहे. कामत यांना अटकेची गरज असल्यास ४८ तासांची नोटीस दिली जाईल, असे विशेष तपास पथकाने स्पष्ट केल्याने कामत यांनी न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्ज मागे घेतला आहे.