महाराष्ट्रात ७ ओमिक्रॉनबाधित, ३ वर्षीय चिमुकलीचा समावेश

0
12

महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे काल शक्रवारी नवे सात रुग्ण सापडले असून त्यात एका ३ वर्षीय चिमुकलीचा समावेश आहे. याशिवाय यातील ४ जणांनी कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्हीही डोस तर एकाने एक डोस घेतलेला होता. ७ पैकी ४ रूग्णांना कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत, इतरांना सौम्य लक्षणे आहेत.

राज्यातील नव्याने आढळलेल्या ७ रूग्णांपैकी ३ रूग्ण मुंबईतील, तर ४ रूग्ण पिंपरी चिंचवड भागातील आहेत. यासह आता राज्यात एकूण आमिक्रॉनबाधित रूग्णांची संख्या १७ झाली आहे. यातील एक रूग्ण मुंबईतील धारावी झोपडपट्टीतील आहे. त्यामुळे दाटीवाटीच्या या परिसरातील संसर्गाचा धोका वाढला आहे.

आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हा रूग्ण ४ डिसेंबर रोजी टांझानियावरून मुंबईत आला होता. विमानतळावर करण्यात येणार्‍या करोना चाचणीत तो पॉझिटीव्ह आढळला. सापडलेल्या बाधित १७ पैकी एक रूग्ण उपचारानंतर बरा झाला आहे.