चोवीस तासांत राज्यात कोरोनाचे ३७ बाधित

0
27

राज्यात गेल्या चोवीस तासांत नवीन ३७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर, कोरोना रुग्णाच्या बळीची नोंद नाही. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ४५० एवढी झाली आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ३४८२ एवढी झाली आहे.

राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी ३५ जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८१ टक्के एवढे खाली आले आहे. गेल्या चोवीस तासांत २७९६ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील ३७ नमुने बाधित आढळून आले. कोरोनाची लक्षणे जाणवल्याने २ जणांना इस्पितळात दाखल करून घेण्यात आले. मडगाव, पणजी आणि नावेली येथे जास्त बाधित रूग्ण आहेत.