महाराष्ट्रात एमपीएसी परीक्षा पुन्हा लांबणीवर

0
175

महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा पुन्हा लांबणीवर पडली आहे. नियोजित वेळेनुसार ही परीक्षा १४ मार्च रोजी होणार होती. मात्र ती आता २१ मार्च रोजी होण्याची दाट शक्यता असून त्याबाबत आज शुक्रवारी दि. १२ रोजी राज्य लोकसेवा आयोगामार्फत तारीख जाहीर केली जाणार आहे.

राज्य सरकारने हे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली. वाढत्या कोरोना संक्रमणामुळे राज्य लोकसेवा आयोगाने ही परीक्षा लांबणीवर टाकली. मात्र याचे राज्यभर उमेदवारांमध्ये तीव्र पडसाद राज्यात उमटले. परीक्षार्थींनी आपली तयारी ठेवावी, येत्या ८ दिवसांत परीक्षा होणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सांगितले.