गोव्यातील वाहन चालकांना फास्‌टॅग ऐच्छिक करा ः कॉंग्रेस

0
171

केंद्रीय रस्ता वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या गोव्यातील सर्व वाहनांना फास्‌टॅग लागू करण्याच्या निर्णयाला कॉंग्रेस पक्षाने विरोध केला आहे. फास्‌टॅग सक्तीमधून गोव्यातील वाहने वगळण्याची मागणी गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत काल केली.
गोव्यातील रस्त्यावर टोलवसुलीची पद्धत अस्तित्वात नाही. वाहन चालकांसाठी फास्‌टॅग म्हणजे अतिरिक्त बोजा आहे. केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्रालयाच्या फास्टॅगमधून गोव्यातील वाहने न वगळल्यास केंद्र सरकारच्या अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले जाणार आहे, अशी माहिती चोडणकर यांनी दिली.

गोव्यातील वाहन चालकांसाठी फास्‌टॅग ऐच्छिक करावा. गोव्यातील परराज्यात वरच्यावर जाणारे वाहन चालकांना फास्‌टॅग घेऊ शकतात, असेही चोडणकर यांनी सांगितले.
भाजपकडून निवडणुकीच्या काळात मतदारांना भुलविण्यासाठी वेगवेगळी आश्‍वासन दिली जातात. १० हजार जणांना नोकर्‍या देण्यासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद नाही. सरकारला खासगी क्षेत्रात रोजगार निर्माण करण्यात यश प्राप्त झाले नाही, असा आरोप चोडणकर यांनी केला.