महाराष्ट्रातील पाच मंत्र्यांना एका महिन्यात कोरोना

0
184

महाराष्ट्रात गेल्या एका आठवड्यात चार मंत्री कोरोनाबाधित आढळले आहेत. तर या महिन्यात एकनाथ खडसेंसह एकूण सहा मंत्री कोरोनाबाधित आढळले आहेत. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यानंतर ठाकरे सरकारमधील शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोना बाधा झाली आहे. कडू यांना दुसर्‍यांना कोरोनाची लागण झाली असून यापूर्वी त्यांना सप्टेंबर महिन्यात करोनाची लागण झाली होती. गुरुवारी सकाळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर एकनाथ खडसे यांचाही करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. खडसे यांच्यापाठोपाठ आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाही कोरोनाची लागण झाली. तर दोनच दिवसांपूर्वी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनाही करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. ते सध्या उपचार घेत आहेत.
एकाच आठवड्यात चार मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत.