दोडामार्ग येथे लॉजवर छापा, ३२ जणांना अटक

0
99

दोडामार्ग येथील दोन लॉजवर अनैतिक व्यवसाय चालू असल्याच्या संशयावरून दोडामार्ग पोलिसांनी काल रविवारी दुपारी अचानक छापे टाकले. त्यावेळी एकूण ३२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यात काही अल्पवयीन मुली, महिला. युवक व काही नागरिकांचा समावेश आहे. दोडामार्ग पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले आहे. दरम्यान, या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ३२ जणांना व्हॅनमध्ये घालून पोलीस स्थानकावर नेले. त्यानंतर त्यातील अल्पवयीनांना व विवाहित महिलांना सोडून देण्यात आले. यात गोव्यातील अनेकांचा सहभाग होता.