मदरशात दहशतवादाचे शिक्षण : भाजप खासदार

0
102

मदरशातून दहशतवादाचे शिक्षण दिले जाते असे वादग्रस्त विधान काल भाजप खासदार साक्षी महाराज यांनी केले. उत्तर प्रदेशमधल्या उन्नाव मतदारसंघाचे खासदार असलेल्या साक्षी महाराज यांनी, मदरसे राष्ट्रीय हितामध्ये नसल्याचे पुढे सांगितले.
मदरसे सरकारी मदत घेतात मग स्वातंत्र्य दिनी झेंडा का फडकवत नाहीत, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, या विधानावर विरोधी पक्षाने तीव्र आक्षेप घेऊन ही भेदभावाची व धार्मिक फूट पाडणारी राजनीती असल्याची टीका केली.