काळा पैसा : मोठ्या निर्यातींवर पाळत

0
80

विदेशी चलन गैरव्यवहारावर नियंत्रणासाठी देशातून होणार्‍या मोठ्या निर्यातींवर लक्ष ठेवण्याची सूचना काल काळ्या पैशांच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने रिझर्व्ह बँकेला व अंमलबजावणी संचालनालयाला केली. १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या निर्यातींवर विशेष लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. दरम्यान, आतापर्यंत निर्यातीसंबंधी माहिती रिझर्व्ह बँकेकडून अंमलबजावणी संचालनालयाला दिली जात नव्हती. एसआयटीने पहिल्यांदाच याबाबतीत दोन्ही संस्थांना एकत्र काम करण्यास सांगितले आहे. प्रत्येक निर्यातीनंतर अहवाल आरबीआयला सादर करायचा असतो, तो न केल्यास बनावटगिरी तसेच ‘हवाला’ प्रकार गृहित धरला जाऊ शकतो. असे प्रकार आढळून आल्यानेच एसआयटीने ही सूचना केल्याचे कळते.