मगोपवर एका कुटुंबाचे नियंत्रण ः मामलेदार

0
147

मगो पक्षावर सध्या एका कुटुंबाचे नियंत्रण आहे ही बाब पक्षाच्या हिताची नाही, असे पक्षाचे नेते व माजी आमदार लवू मामलेदार यांनी काल सांगितले. मगोप अध्यक्ष दीपक ढवळीकर यांची एकाधिकारशाही चालू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मगो पक्षाचे एकेकाळचे धडाडीचे नेते रमाकांत खलप, पांडुरंग राऊत, रवी नाईक, धर्मा चोडणकर यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले जावेत, अशी सूचना आपण केली होती. मात्र, पक्षाच्या आघाडीच्या नेत्यांनी त्यात रस घेतला नाही, असा आरोप मामलेदार यांनी केला.

मगो पक्षात हल्लीच प्रवेश केलेल्या डॉ. केतन भाटीकर यांना आपणच पक्षात आणले होते. तसेच माजी मंत्री स्व. डॉ. काशिनाथ जल्मी यांच्या पुत्राला मगोत प्रवेश दिला जावा, अशी सूचनाही आपण केली होती, असे मामलेदार यांनी सांगितले.