भोम येथील अपघातात महिला जागीच ठार

0
102

भोम येथे आज सायंकाळी ६च्या दरम्यान झालेल्या रस्ता अपघातात मारिया नातालिया रॉड्रिग्स (४०) राहणार सांताक्रुझ – फोंडा ही विवाहित महिला जागच्या जागी ठार झाली. त्या पणजी येथील कार्यालयातून जी. ए. ०५ एच ५७२९ नंबरच्या दुचाकीने फोंड्याकडे येत होत्या. ६च्या दरम्यान जी. जी. ०२ व्ही. व्ही. ७९०७ नंबरच्या कंटेनर गाडीने दुचाकीला धडक दिली असता मारिया ही महिला उसळून रस्त्यावर पडली व जागीच मरण पावली. कंटेनर गाडी पणजीमार्गे जात होती. फोंडा पोलिसांना खबर दिल्यानंतर उपनिरीक्षक सूरज गावस यानी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी गोमॅकॉत पाठवले. मयत महिलेच्या मागे पती व दोन मुले आहेत. नाताळ उत्सवाच्या पूर्वसंध्येला या दु:खद घटनेची माहिती फोंड्यात कळताच दु:खाची छाया पसरली. सांताक्रुझ भागात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास सूरज गावस करीत आहेत.