नाताळचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न

0
111

कॉंग्रेसचा सरकारवर आरोप
सुशासनाच्या नावाखाली आज दि. २५ रोजी नाताळच्या सुटीचे महत्त्व कमी करण्याच्या निर्णयामुळे राज्यातील ख्रिश्ती तसेच हिंदू बांधवांमध्येही नाराजी पसरली असून या निर्णयामुळे भाजप सरकारचे खरे रूप उघड झाल्याचे प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते सुनील कवठणकर व कळंगुटचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी काल संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. चर्चकडूनही योग्य तो संदेश निघेल असे फर्नांडिस म्हणाले.नाताळच्या दिवशी म्हणजे आज कार्यालयात हजर राहणे सक्तीचे नसले तरी सरकारने सूचना दिल्यानंतर कार्यालयात गैरहजर राहण्याचे धाडस कोण करणार, असा प्रश्‍न त्यांनी केला. नाताळ हा ख्रिश्ती बांधवांचा सण असला तरी या सणात हिंदू बांधवही तेवढ्याच आनंदाने सामील होतात. अशा परिस्थितीत सुट्टीचे महत्त्व कमी करण्याचा मोदी सरकारचा निर्णय चुकीचा आहे. भाजपमध्ये असलेले ख्रिश्ती बांधव या प्रश्‍नावर मौन पाळून का आहेत, असा प्रश्‍न त्यांनी केला. राज्यातील सामाजिक सलोखा बिघडविण्याचाच हा सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप फर्नांडिस व कवठणकर यांनी केला.