बाळासाहेबांना भारतरत्न द्या : शिवसेना

0
87

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही ‘भारतरत्न’ देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेना आणि भाजप हे केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांचे कार्य जसे महान आहे, तसेच बाळासाहेबांचेही कर्तृत्व अनमोल असल्याने त्यामुळे त्यांनाही भारतरत्न द्यावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. बाळासाहेबांनी गोरगरीबांसाठी केलेले कार्य मोठे आहे. त्यामुळे देशाच्या सर्वोच्च सन्मानाने त्यांचा गौरव व्हावा, असे शिवसेनेचे नेते मनोहर जोशी म्हणाले.