भोपाळमध्ये रुग्णालयाला आग, ४ मुलांचा मृत्यू

0
24

मध्यप्रदेशामधील भोपाळ शहरातील कमला नेहरु रुग्णालयातल्या लहान मुलांच्या कक्षाला आग लागून चार मुलांचा मृत्यू झाल्याची घटना काल घडली. या कक्षातून ३६ मुलांना बाहेर काढण्यात यश आले आहे. या रुग्णालयाच्या तिसर्‍या मजल्यावर चिल्ड्रन्स वॉर्ड आहे. आग लागल्यानंतर रुग्णांना स्ट्रेचरवरुन बाहेर काढण्यात येत होते.

मात्र, या रुग्णांच्या कुटुंबियांना आत प्रवेश दिला जात नव्हता. आपल्या मुलांचा शोध घेण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांचा मात्र गोंधळ उडाला होता. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची माहिती देण्यात आली. या घटनेबद्दल मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शोक व्यक्त केला आहे.