श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी केली एका नागरिकाची हत्या

0
26

जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमधील बोहरी कदल भागात सोमवारी दहशतवाद्यांनी एका नागरिकाची गोळ्या झाडून हत्या केली. काश्मीरमध्ये २४ तासांत झालेला हा दुसरा दहशतवादी हल्ला होता. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांदीपोरा येथील मोहम्मद इब्राहिम खान (४५) यांची सोमवारी दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली.

मोहम्मद हे सेल्समन म्हणून काम करायचे. रुग्णालयात उपचारादरम्यान इब्राहिम यांचा मृत्यू झाला. श्रीनगरमधील बांदीपोरा येथील निवासी गुलाम मोहम्मद खान यांचा मुलगा मोहम्मद इब्राहिम खान यांना जवळून गोळी मारण्यात आली. ज्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. खान यांच्या मृत्यूनंतर खोर्‍यातील एकूण नागरिकांचा आकडा १५ वर पोहोचला आहे.