भारत श्रीलंका दुसरी कसोटी आजपासून

0
95

पहिल्या कसोटीत पाऊस आणि अंधुक प्रकाशामुळे विजयापासून तीन पाऊले दूर राहिलेली टीम इंडिया आज शुक्रवारपासून नागपुरात होणार्‍या दुसर्‍या कसोटी सामन्यात श्रीलंकेवर वर्चस्व राखण्यासाठी सज्ज झाली असून विजयाच्या इराद्याने मैदानावर उतरणार आहे.
पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात अपयशी ठरल्यानंतर दुसर्‍या डावात गोलंदाजांवर वर्चस्व राखातनानाच शेवटच्या दिवशी श्रीलंकन फलंदाजांना बॅकफूटवर पाठविणार्‍या विराट कोहली आणि सेनेचे मनोबल निश्‍चितच वाढलेले असेल. ईडग गार्डन्ससारखीच जामाथामधील विदर्भ क्रिकेट संघाच्या मैदारावरही भारताला पुन्हा एकदा हिरवळ असेलेली खेळपट्टी मिळेल. पुढील महिन्यातील दक्षिण आफ्रिकेचा लांब दौरा डोळ्यांपुढे ठेवून तयारीसाठी हिरवळ असेलेली खेळपट्टी बनविण्यात आली आहे.
ही खेळपट्टी चांगली दिसत आहे. पहिले दोन दिवस ती तेज गोलंदाजांना मदतगार ठरेल, असे भारतीय कर्णधार विराट कोहलीने सांगितले.

शिखर धवनने काही वैयक्तिक कारणांमुळे ब्रेक घेतला असल्याने मुरली विजय अंतिम अकरात खेळणार आहे. भुवनेश्वर कुमार नसल्याने अनुभवी गोलंदाजी ईशांत शर्माचा अंतिम अकरात समावेश निश्‍चित असेल. आता भारत दोन फिरफीपटूंना मैदानावर उतरवतोय की नाही ते पहावे लागेल. कारण गेल्या सामन्यात रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा आपला प्रभाव पाडू शकले नव्हते. त्यामुळे बदल म्हणून चायनामेन कुलदीप पवारला संधी मिळू शकते. तर अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आलेल्या विजय शंकरलाही कसोटी पदार्पणाची संधी मिळू शकते. मध्यमगती गोलंदाज असलेल्या शंकरने ३२ प्रथमश्रेणी सामन्यांत २७ बळी मिळविलेले आहेत. तर ४९.१६च्या सरासरीने पाच शतके आणि १० अर्धशतके नोंदविलेली आहेत. हार्दिक पांड्यासाठी पर्याय म्हणून शंकला सहाव्या स्थानी फलंदाजीसाठी पाठवू शकतात. लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार कोहली आत्मविश्वासने ओतप्रोत असतील. अजिंक्य रहाणेला पुन्हा लय मिळविणे अत्यावश्यक आहे. दुसर्‍या बाजूने श्रीलंकन संघ पहिला कसोटी सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळाल्याने खूश असेल. परंतु पहिल्या दोन दिवसांत त्यांच्या गोलंदाज व फलंदाजांनी वर्चस्व राखले होते. तीच लय कायम ठेवण्याचा प्रयत्न ते करतील.

संभाव्य संघ पुढील प्रमाणे ः भारत : विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, उमेश यादव, ईशांत शर्मा, विजय शंकर, कुलदीप यादव, रोहित शर्मा.
श्रीलंका : दिनेश चंदीमल (कर्णधार), अँंजेलो मॅथ्यूज, दिमुथ करुणारत्ने , निरोशन डिकवेला, धनंजय डिसिल्वा, सुरंगा लकमल, दासुन शनाका, विश्वा फर्नांडो, लाहिरू गामेगे, लक्षण संदाकन, सदीरा समरविक्रमा, दिलरूवान परेरा आणि रोशन सिल्वा.