Home Featured ‘भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद

‘भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद

0

केंद्राच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात संयुक्त किसान मोर्चाच्या ‘भारत बंद’ला काल संमिश्र प्रतिसाद मिळाला, तर भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी संयुक्त किसान मोर्चाने पुकारलेला भारत बंद पूर्णपणे यशस्वी झाल्याचा दावा केला.

आपला संताप व्यक्त करण्यासाठी देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरले. देशातील हजारो ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. शेतकर्‍यांबरोबरच कामगार, व्यापारी, कर्मचारी संघटनांचाही भारत बंद पाठिंबा मिळाला. देशातील राजकीय पक्षांनीही बंदला पाठिंबा दिला. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बंदला पाठिंबा मिळाला, असा दावा राकेश टिकैत यांनी केला.