राज्यात नवे ५० कोरोना रुग्ण

0
35

>> दिवसभरात शून्य बळींची नोंद; सक्रिय रुग्णसंख्या ८६२

गेल्या २४ तासांत राज्यात ५० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही.

गेल्या २४ तासांत राज्यात ३६५७ जणांची कोविडसाठी चाचणी करण्यात आली, त्यापैकी ५० जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. राज्यातील कोविड पॉझिटिव्हिटी टक्केवारी १.३६ एवढी आहे, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.६४ टक्क्यांवर पोहोचले आहे.

गेल्या २४ तासांत १०६ जण कोविडमुक्त झाले. त्यामुळे राज्यातील सक्रिय कोविड रुग्णांची संख्या ८६२ एवढी झाली आहे. गेल्या २४ तासांत इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ६ एवढी आहे, तर इस्पितळात भरती केलेल्या रुग्णांची संख्या १२ एवढी आहे.
मडगाव शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागलेली असून, या घडीला सर्वाधिक १३५ रुग्ण मडगाव शहरात आहेत. पणजीत ५५, कांदोळी ५२, पर्वरीत ४०, कुठ्ठाळीत ४०, फोंड्यात ३९, शिवोलीत ३९, काणकोणात ३०, चिंबलमध्ये २४, हळदोण्यात २५, कुडतरीत २८, कांसावलीत ३०, चिंचोणेत २६, केपेत १९, लोटलीत १५ अशी रुग्णसंख्या आहे.

सतीश धोंड यांनाही कोरोना
भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या पाठोपाठ काल भाजपचे संघटनमंत्री सतीश धोंड यांना कोविडचा संसर्ग झाल्याचे समोर आले. आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.