भारत-तालिबानमध्ये दोहा येथे बैठक

0
37

अफगाणिस्तानात तालिबानी सरकारच्या स्थापनेनंतर भारताशी त्यांच्या संबंधांबद्दल अनेक तर्क-वितर्क लावले जात असतानाच दोहा येथील कतारमधील भारतीय राजदूताने तालिबानचे सर्वोच्च नेते शेर मोहम्मद स्टानेकझाई यांची भेट घेतली. पहिल्यांदाच भारत आणि तालिबान यांच्यात औपचारिक बैठक झाली आहे. भारतीय राजदूत दीपक मित्तल यांनी दोहा येथील तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख शेर मोहम्मद अब्बास यांची भेट घेतली.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने, तालिबानने भेटण्यासाठी ही विनंती केली होती. दोहा येथील भारतीय दूतावासात दोन्ही प्रतिनिधींची ही भेट झाली. यावेळी अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेविषयी चर्चा झाली, असे एका निवेदनात म्हटले आहे.