पंजशीरवरील हल्ल्यात ८ तालिबानी ठार

0
41

अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमधून माघारी आल्यानंतर लगेचच तालिबान्यांनी पंंजशीरवर हल्ला केला. मात्र या हल्ल्यात तालिबानचे मोठे नुकसान झाले असून त्यात ८ तालिबानी ठार झाले आहेत. पंजशीरमधून तालिबानच्या हल्ल्याला नॉदर्न अलायन्सकडून सडेतोड उत्तर मिळाले आहे.

तालिबानच्या विरोधात लढणार्‍या नॉर्दर्न अलायन्सच्या दाव्यानुसार सोमवारी रात्री तालिबान्यांनी पंजशीर खोर्‍यात घुसण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला आणि या लढाईत ८ तालिबानी मारले गेले. पंजशीर हा एकमेव प्रांत आहे जो अजून तालिबानच्या ताब्यात आलेला नाही.
नॉर्दर्न अलायन्सच्या मते, या लढ्यात त्यांचेदेखील दोन लोक मारले गेले आहेत. तालिबानने संपूर्ण देश काबीज केला आहे, पण तो अजून पंजशीरवर नियंत्रण मिळवू शकलेला नाही. येथे अहमद मसूदच्या नेतृत्वाखाली उत्तर आघाडीच्या लढवय्यांनी तालिबानविरुद्ध युद्ध पुकारले आहे.

अहमद शाह मसूद यांचे पुत्र अहमद मसूद आणि अफगाणिस्तानचे कार्यवाहक अध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांच्या नेतृत्वाखाली उत्तर आघाडीने तालिबानच्या विरोधात युद्ध फुकारले आहे. गेल्या काही दिवसात तालिबानने अनेक वेळा येथे घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी ते अपयशी ठरले. काही दिवसांपूर्वीही पंजशीरमध्ये सुमारे ३०० तालिबानी मारले गेले होते.

चर्चेसाठीही प्रयत्न
दरम्यान, दोन्ही बाजूंनी चर्चा करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. तालिबानने अलीकडेच दावा केला होता की, ते पंजशीरच्या लोकांशी बोलत आहेत त्याचवेळी, नॉर्दर्न अलायन्सचे अहमद मसूद यांनी स्पष्ट केले होते की, ते तालिबानशी चर्चेसाठी तयार आहेत. सरकार स्थापनेसंदर्भात देखील होईल. पण जर तालिबानला युद्ध हवे असेल तर युद्धही केले जाईल.