अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्य माघारी

0
72

काल दि. ३१ ऑगस्ट रोजी अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्य माघारी आले आणि अमेरिकेकडून राबवल्या जाणार्‍या गेल्या २० वर्षांच्या मिशनचा अंत झाला. तालिबानच्या रुपातील दहशतवाद संपवण्याचा निर्धार करत अफगाणिस्तानात दाखल झालेल्या अमेरिकन सेनेने शेवटी २० वर्षांनंतर तालिबानकडेच सत्ता सोपवली.

अफगाणिस्तानातून बाहेर पडणार्‍या अमेरिकेच्या शेवटच्या सैनिकाचा फोटो खुद्द अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने ट्विट केला आहे. आणि याचसोबतच, अफगाणिस्तानातील पंजशीर खोरे वगळता उर्वरित अफगाणिस्तानावर तालिबानने वर्चस्व मिळवले आहे.

सोमवारी रात्री अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर तालिबानने आपल्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला. तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहीन याने आता आपला देश पूर्णपणे स्वतंत्र असल्याचे सांगितले.

अमेरिकेचे आश्‍वासन
लष्करी मदकार्य संपलेले असले तरी राजनैतिक पद्धतीने अमेरिकन आणि अफगाणी नागरिकांना मदत करणे आम्ही सुरुच ठेवणार असल्याचे अमेरिकेने स्पष् केले आहे.