Home Featured भारत-अमेरिकेतील संबंध मजबूत करणार : बायडन

भारत-अमेरिकेतील संबंध मजबूत करणार : बायडन

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौर्‍यावर असून, काल त्यांनी द्विपक्षीय बैठकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची भेट घेतली. यावेळी बायडन यांनी भारत आणि अमेरिकेतील भागीदारी अधिक मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले.
नरेंद्र मोदी हे व्हाईट हाउसमध्ये दाखल झाल्यानंतर जो बायडन यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

भारत-अमेरिका संबंधांमध्ये आज एक नवीन अध्याय सुरू होत आहे. रोज ४० लाख भारतीय-अमेरिकन अमेरिकेच्या बळकटीसाठी योगदान देत आहेत, असे बायडन म्हणाले.
भारत-अमेरिका यांच्यामध्ये मजबूत मैत्रीची बीजे पेरली गेली आहेत. भारत-अमेरिका संबंधांमध्ये व्यापार महत्त्वाची भूमिका बजावेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.