Home Featured आयपीएल सट्टेबाजीप्रकरणी सहा जणांना ठोकल्या बेड्या

आयपीएल सट्टेबाजीप्रकरणी सहा जणांना ठोकल्या बेड्या

0

>> वास्को पोलिसांची कारवाई; लॅपटॉप,मोबाईलसह अन्य साहित्य जप्त

वास्को पोलिसांनी एका माहितीच्या आधारे वाडे-वास्को येथील ‘सुशीला सी विंग’च्या एका सदनिकेत गुरुवारी मध्यरात्री छापा टाकून आयपीएल सट्टेबाजीचा प्रकार उधळून लावला. या कारवाईत ६ जणांना अटक करण्यात आली. तसेच संशयितांकडून विविध सामान जप्त करण्यात आले, अशी माहिती वास्को पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर टोळी १९ सप्टेंबरपासून वाडे परिसरात कार्यरत होती. गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या विश्वसनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही धडक कारवाई केली. या कारवाईदरम्यान वास्को पोलिसांनी ६ जणांना अटक केली. त्यात चौघे नागपूर, १ मध्यप्रदेश, तर १ राजस्थानमधील असल्याची माहिती समोर आली आहे. दिलीप नानीकरम कुकरेजा (वय ३१), गुलशन इंदिरा कुमार टिक्यानी (वय ३०), रोहित नरेश नाडनानी (वय २४), गिरीश दिवाण लालवानी (वय २६, सर्व रा. नागपूर), विजय देवीलाल जट (वय २३, रा. राजस्थान) आणि प्रकाश सिंह (वय २९, रा. मध्य प्रदेश) अशी संशयितांची नावे आहेत. या छाप्यात पोलिसांनी २ लॅपटॉप, अनेक मोबाईल फोन, फोन कॉल प्राप्त करण्यासाठी मोबाईल फोनशी जोडलेली दोन सुधारित उपकरणे व एक टीव्ही जप्त केला आहे.